शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

आज एक गंमत घडली. ट्रेन मध्ये प्रवास करत असतांना एका बाईचा मोबाईल वाजला. पन्नाशि मध्ये असावी ती. कॉल घेऊन ती गुजराती मध्ये बोलू लागली. ओउ लड़को होय छो। आणि मग ती सगळ्या नातेवाइकांना फोन करत सांगत सुटली। लड़को होय छो। लड़को या शब्दावरचा तिचा जोर स्पष्ट जाणवत होता किंबहुना ती तिच्या नातेवाइकांना जाणवुन देत होती. अजूनही मुलगाच झाल्याचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर दिसतो.